योजना व अनुदानAgroStar
PM फसल विमा(PMFBY) अंतिम अर्ज़ी तारीख – 31 जुलै 2025
👉प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ किंवा कीड रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळते. ही योजना खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी लागू केली जाते.👉खरीप २०२५ हंगामासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नजीकच्या CSC केंद्र, बँक शाखा किंवा राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करावी.👉या योजनेत शेतकऱ्यांना नामांकन करताना फक्त २% प्रीमियमभरावा लागतो (खरीप पिकांसाठी). उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून दिली जाते. विमा भरपाई थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.👉आवश्यक कागदपत्रे:आधार कार्ड
७/१२ उतारा किंवा खातेदारी दस्त
बँक पासबुक
पिक लागवडीचा पुरावा👉ही योजना ऐच्छिक असली तरी बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानाचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्याने याचा लाभ घ्यावा.
३१ जुलैपूर्वी अर्ज करा आणि आपली पिकं सुरक्षित करा!👉संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.