AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
सोयाबीनमधील अळी, खोडमाशी आणि व्हायरसचे नियंत्रण
या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकात येणाऱ्या प्रमुख कीड आणि रोगांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उंट अळी, केसाळ अळी व तंबाखू अळी हे तीन प्रकार मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. यावर नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांचा (क्लोरांट्रानिलिप्रोल, थायोमिथॅम) वापर, IPM पद्धती आणि फवारणीचे योग्य तंत्र महत्त्वाचे आहे. 👉चक्री भुंगा व खोडमाशीची लक्षणे ओळखून वेळेवर नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. यासोबतच, व्हायरसचा प्रसार करणारी पांढरी माशीही नियंत्रित करणे गरजेचे आहे. या समस्यांपासून बचावासाठी JS 9560 सारखी सहनशील जात वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 👉फवारणी करताना योग्य वेळ, द्रावणाचे प्रमाण आणि सुरक्षेची काळजी घेणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. हे एकात्मिक व्यवस्थापन (IPM) तंत्र पिकाचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे. 👉संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
0
7
इतर लेख