योजना व अनुदानAgroStar India
सौर कृषी पंप योजना 2025 | पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि फायदे जाणून घ्या l
सौर कृषी पंप योजना 2025
👉शेतकरी मित्रांनो, ट्रिपिंग, लोडशेडिंगमुळे आता सिंचन थांबणार नाही! महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांनी सुरू केलेल्या सौर कृषी पंप योजनेतून दिवसा अखंड वीज – तीही सौरऊर्जेमधून – मिळणार आहे.
👉या योजनेअंतर्गत 3 ते 7.5 HP पर्यंतचे सौर पंप लघु, सीमान्त व अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. अर्जदाराकडे स्वतःच्या नावे जमीन आणि कृषी वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
📝 अर्ज कसा कराल?
महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करा. आधार, 7/12 उतारा, जात प्रमाणपत्र आणि बँक पासबुक यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.
👉सरकारकडून मिळणारी 90% सबसिडी ही योजनेचं विशेष आकर्षण आहे. मात्र फसवणुकीपासून सावध राहा – केवळ अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करा.
👉दिवसाच्या वेळेस सिंचनासाठी हवीय सौरऊर्जा? तर ही योजना तुमच्यासाठीच आहे!
👉संदर्भ : AgroStar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.