ओमनिस्टार प्लस हे भात पिकातील तण नियंत्रण करणारे आधुनिक औषध आहे.
ओमनिस्टार प्लस ची फवारणी तण 1 ते 3 पानांच्या अवस्थेत असताना केल्यास तण पूर्ण मुळा पासून नष्ट होतात.
यामध्ये दोन वेगवेगळ्या तणनाशकांचे एकत्रित मिश्रण आहे, जे मिळून जास्त प्रभाव देतात – विशेषतः पाखड (Echinochloa spp.) आणि लव्हाळा (Cyperus spp.) यांसारख्या अडथळा आणणाऱ्या तणांवर प्रभावी नियंत्रण मिळते.
ओमनिस्टार प्लस हे औषध तणाच्या आतील भागात जाऊन प्रथिने तयार होण्याची प्रक्रिया थांबवते. त्यामुळे तणांची वाढ होत नाही आणि तण हळूहळू सुकून मरते.
फायदे
ओमनिस्टार प्लस हे एक प्रभावी तणनाशक आहे, जे भात पिकातील सर्व प्रकारच्या तणांवर (गवतासारखे, रुंद पानांचे आणि लव्हाळा सारखे तण ) एकाच वेळी नियंत्रण ठेवते.
हे औषध भात पिकासाठी तसेच पुढच्या पिकासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत , जेव्हा तण पिकाशी अन्नासाठी प्रतिस्पर्धा करतात, त्या अवस्थेत संपूर्ण हंगामभर तणांवर प्रभावी नियंत्रण ठेवते.
हे तणनाशक पर्यावरणासाठी आणि प्राण्यांसाठी सुरक्षित आहे, त्यामुळे वापरण्यास योग्य.
फवारणीनंतर ६ तासांनी पाऊस आला तरी औषधाचा चांगला परिणाम मिळतो.
परिणामकारकता
पाखड,बराग, माका (भृंगराज) लव्हाळा
प्रमाण
डोस - 100 ग्रॅम (हे.)
वापरण्याची पद्धत
फवारणी
पिकांसाठी लागू
भात
पुनर्वापर आवश्यकता
1-3 तण पानांच्या अवस्थेत वापर करावा
तण उगवण्यापूर्वी आणि उशिरा उगवणी नंतरची अवस्था (तीन-पानांच्या पुढील अवस्थेतील तण) मध्ये वापर टाळावा.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.