वीडस्लॅम हे सोयाबीन पिकासाठी वापरण्यात येणारे तण उगवणीपूर्वीचे तणनाशक आहे, जे मुख्यतः रुंद पानांच्या व सेज तणांचे तन उगवणीपूर्वी नियंत्रण करते.हे तणनाशक अॅसिटो लॅक्टेट सिंथेस (एएलएस) या एन्झाइमला अडथळा आणतो, ज्यामुळे तीन आवश्यक अमिनो अॅसिडचे उत्पादन थांबते. हे अमिनो अॅसिड मुख्यतः मुळांच्या व शेंडा वाढीच्या भागात कार्यरत असतात. वीडस्लॅम तणांच्या मुळांद्वारे आणि काही प्रमाणात शेंडयाद्वारे शोषले जाते, त्यामुळे तण उगवण्याआधीच त्यांचा नाश होतो. प्रथिन निर्मिती आणि पेशी विभाजन बंद झाल्यामुळे तण मरतात आणि पिकाची निरोगी वाढ होते.
फायदे
वीडस्लॅम वापरल्यास तण नियंत्रण सोपे होते, कारण सोयाबीन पेरणी आणि तणनाशकाची फवारणी एकाच वेळी करता येते.
वीडस्लॅम हा प्रणालीगत तणनाशक असून, सोयाबीनमधील प्रमुख रुंद पानांचे व सेज तणांचे उत्कृष्ट नियंत्रण करते तसेच काही गवत तणांची वाढ थांबवते.
प्रमाण आणि फवारणी: 1 एकरासाठी 12.4 ग्रॅम वीडस्लॅम लागते, जे नॅपसॅक स्प्रेयर (फ्लड जेट नॉझल) किंवा ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयर च्या मदतीने पेरणीनंतर फवारता येते. स्मार्ट तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी आणि फवारणी एकाच वेळी करता येते.
शिफारस केलेल्या डोसनुसार वापरल्यास वीडस्लॅम हे सोयाबीन आणि पुढील महत्त्वाच्या पिकांसाठी सुरक्षित आहे.
तण उगवण्यापूर्वीच ते त्यांना नष्ट करते, त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही.
वीडस्लॅम अशा तणांवर प्रभावी आहे, जे सध्या इतर तणनाशकांमध्ये प्रभावीपणे नियंत्रित होत नाहीत.